काँग्रेस-शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने ; राहुल गांधींच्या सभेला BMC ने परवानगी नाकारली
मुंबई : काँग्रेस-शिवसेना पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये राहुल गांधींच्या सभेला BMC ची मंजुरी नाही, त्यामुळे काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 28 डिसेंबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क सभा येथे होणार होती, मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेने ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन या सभेला मान्यता दिली नाही. BMC मध्ये शिवसेना सत्तेत आहे आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसेना एकत्र सत्तेत आहेत.
राज्यातील सत्तेत काँग्रेस असताना देखील राहुल गांधींच्या रॅलीला परवानगी नाकारल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने काँग्रेसची याचिका स्वीकारली आहे आणि मुंबई उच्च न्यायालयात उद्या या प्रकरणाची सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये राज्य सरकार, मुंबई पोलिस आयुक्त, बीएमसी, बीएमसी आयुक्तांना पक्षकार करण्यात आले आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजी पार्कमध्ये सर्व राजकीय मेळावे आणि सभांना बंदी घालण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. येथे केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच आयोजित करता येऊ शकतात. तेही वर्षात फक्त 3-4 दिवस. याचिकेत शिवाजी पार्कवर सभा आयोजित करण्याची परवानगी मागितली आहे.
दरम्यान राहुल यांच्या दौऱ्यावर ओवैसींनी उपस्थित केला होता सवाल. या दौऱ्यावरन रविवारी AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीही प्रश्न उपस्थित करत म्हटले होते की, ओमिक्रॉनचा धोका आज आहे आणि जेव्हा राहुल गांधी येतील तेव्हा तो धोका टळणार आहे का? जर ओमिक्रॉनचा धोका टळला नाही तर राहुल गांधींच्या सभेवेळी कलम 144 लागू केली जाऊ नये?