काँग्रेसच्या स्टेजवरून राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचे फोटो हद्दपार

Congress President : 25 वर्षानंतर प्रथमच गांधी घराण्याबाहेरचे व्यक्ती असलेले मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत. त्यामुळे खर्गे आज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.;

Update: 2022-10-26 05:10 GMT

16 ऑक्टोबर रोजी झालेल्या काँग्रेस (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शशी थरुर (Shashi Tharoor) यांचा पराभव केला. त्यामुळे तब्बल 25 वर्षानंतर काँग्रेस अध्यक्षपदी गांधी घराण्याबाहेरच्या व्यक्तीची निवड झाली. त्यातच आज मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. त्यासाठी नवी दिल्लीत जोरदार तयारी करण्यात आली. मात्र या स्टेजवरून राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांचा फोटो गायब असल्याचे दिसून आले.

राहुल गांधी यांनी भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेदरम्यान खर्गे हेच काँग्रेसचे सुप्रिमो असतील असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राहुल गांधी हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमध्ये (AICC) असतील का? यावरूनही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. दरम्यान मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पदग्रहण समारंभाच्या स्टेजवर सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांचेच फोटो असल्याचे दिसून आले. यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे फोटो स्टेजवर लावण्यात आले नाहीत.

 

Tags:    

Similar News