काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील तिसरा अर्ज बाद

Update: 2022-10-02 05:46 GMT

एकीकडे काँग्रेसची जोडो भारत यात्रा सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात या निवडणूकीसाठी तीन अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तिसरा अर्ज बाद ठरला आहे.

देशात काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीची जोरदार चर्चा सुरू आहे. या निवडणूकीत माजी मंत्री शशी थरूर, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि झारखंडचे माजी मंत्री के.एन.त्रिपाठी यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीतील चुरस वाढली आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना मधुसूदन मिस्री म्हणाले की, उमेदवारी अर्जाची छाणणी करण्यात आली. यात एकूण 20 अर्ज आले होते. त्यापैकी चार अर्ज बाद ठरले. यामध्ये सह्यांची पुनरावृत्ती आणि काही सह्या जुळत नसल्याने हे अर्ज फेटाळण्यात आले. यामध्ये शशी थरुर यांनी पाच तर एक अर्ज के. एन त्रिपाठी यांनी भरला होता. मात्र यापैकी त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे काँग्रेसची निवडणूक शशी थरुर विरुध्द मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात रंगणार आहे.



Tags:    

Similar News