अखेर डॉ. प्रज्ञा सातव यांना कॉंग्रेसकडून विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर

Update: 2021-11-15 07:31 GMT

कॉंग्रेसच्या युवा बिग्रेडचे नेते राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना कॉंगेसकडून आज विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटात बाधा झाल्यानंतर दिर्घ संघर्षानंतर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, पक्षानं रजनी पाटील यांना राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली. त्या पाठवलं. त्यामुळं सातव यांच्या एका गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. आता मात्र, काँग्रेसने प्रज्ञा सातव यांच्यावर विश्वास दाखवत विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.

काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट घोषीत केलं आहे.

दरम्यान, काँग्रेसने डॉ. प्रज्ञा सातव यांची कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून स्थान दिलं आहे. तसंच, काँग्रेसने जबाबदारी दिल्यानंतर प्रज्ञा सातवदेखील हिंगोली मतदारसंघात सक्रीय झाल्या आहेत. अनेक कार्यक्रमात ते हजेरी लावत असतात. राजीव सातव यांच्या राजकीय वारसा पत्नी प्रज्ञा सातव सांभाळणार असल्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यातील व राज्यातील लोकांना विकास प्रिय नेता मिळणार असल्याची आतुरता लागली आहे.

Tags:    

Similar News