'..तर पोलिसांनी भाजप नेत्यांच्या मुसक्या आवळाव्यात' - सचिन सावंत

केंद्र सरकारनकडून एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात असताना,दुसरीकडे भाजपाने पुन्हा मंदिरांचे राजकारण करायला सुरुवात केल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

Update: 2021-08-28 11:29 GMT

मुंबई- केंद्र सरकारकडून एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात असताना, आणि राज्यात कोरोनाची ६० लाख नागरिकांना लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे भाजपाने पुन्हा मंदिरांचे राजकारण करायला सुरुवात केल्याची टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. सोबतच नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार? जन आशिर्वाद यात्रेत कोरोना नियमांच्या उल्लंघनाबाबत इतके गुन्हे दाखल होऊनही भाजपाचे डोके ठिकाणावर आले नाही. आता तिसरी लाट लवकर आणण्यासाठी मंदिरे उघडणे व दहिहंडी आयोजनाचा हट्ट करत आहेत. असं सावंत यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून भाजपवर जोरदार निशाणा साधला.





  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कालच महाराष्ट्रात उत्सवावर निर्बंध घालावेत असा निर्देश दिले आहे. मात्र सुपरस्प्रेडर भाजपा स्वार्थी राजकारणाकरिता जनतेचा जीव धोक्यात घालत आहे. असं सावंत यांनी म्हटले आहे. जर भाजपा नेत्यांनी ऐकले नाही व नियमांचे उल्लंघन केले तर पोलिसांनी मुसक्या आवळाव्यात. कुठलीही दया दाखवू नये!,असं मत सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे.
Tags:    

Similar News