शरद पवार यांच्यावरील टीकेचा देवेंद्र फडणवीस यांना आला राग

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसने पवार यांच्यावर टीका केली. मात्र या टीकेमुळे देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच राग आल्याचं पहायला मिळालं.

Update: 2023-04-09 06:37 GMT

अदानी प्रकरणावरून काँग्रेसने संयुक्त संसदीय समितीची मागणी केली जात असतानाच शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली. त्यानंतर काँग्रेसने शरद पवार यांच्यावर टीका केली. मात्र या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर (Hindenburg Report) काँग्रेसने अदानी प्रकरणावरून मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. त्यातच संयुक्त संसदीय समितीची (JPC) मागणी करत काँग्रेसने (Congress) संसदेत गदारोळ केला. मात्र त्यानंतरही सरकारने संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यास नकार दिला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अदानी प्रकरणावर आपली भूमिका मांडताना कोण हिंडेनबर्ग? असं म्हणत बाहेरच्या देशातील एखाद्या संस्थेने अहवाल दिल्याने त्याचा देशातील स्थितीवर परिणाम करून घेण्याची गरज नसल्याचं शरद पवार (Sharad pawar) म्हणाले. तसंच पुर्वी सरकार टाटा आणि बाटाचे असल्याचे म्हटले जात होते. आता सरकार अदानी आणि अंबानीचे असल्याचे म्हटले जाते. मात्र टाटा आणि बाटाचे जसं देशाच्या विकासात योगदान आहे. तसेच योगदान अदानी आणि अंबानी यांचेही आहे. त्यामुळे याबाबत आपण विचार करायला हवा, असं शरद पवार म्हणाले. त्यावरून काँग्रेस नेत्या अलका लांबा (Congress leader Alka lamba Tweet) यांनी ट्वीट करून शरद पवार यांच्यावर टीका केली.

अलका लांबा यांनी एक फोटो ट्वीट केला (Alka lamba Tweet) आहे. ज्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदानी एकत्र बसलेले आहेत. या ट्वीटमध्ये अलका लांबा यांनी म्हटले आहे की, घाबरलेले लालची लोक हे आज आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी तानाशाह सत्ताधाऱ्यांचे गुण गात आहेत. देशातील लोकांची लढाई एकटा राहुल गांधी लढत भांडवलदार चोरांशी आणि चोरांना वाचवणाऱ्या चौकीदाराशी....

अलका लांबा यांच्या ट्वीटनंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट (Devendra Fadnavis Tweet on pawar) केलंय. राजकारण आपल्या जागी आहे आणि ते होत राहील. पण जे भारताच्या राजकारणातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आहेत, दीर्घकाळचे सहयोगी आहेत आणि ज्यांनी चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवले आहे. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे घातक आहे. राहुल गांधी भारताची प्रगल्भ संस्कृती संपवण्याचे काम करीत आहेत !, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी अदानींची पाठराखण केल्यानंतर काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार यांना लालची अशी उपमा दिली. त्यावरून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच राग आल्याचे पहायला मिळाले. (Devendra Fadnavis Criticize to Alka lamba because of she criticize to Sharad pawar)

Tags:    

Similar News