Gujrat Election 2022 : गुजरात निवडणूकीसाठी 'हे' आहेत काँग्रेसचे स्टार प्रचारक
गुजरात निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे या निवडणूकीसाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कोणत्या नेत्यांचा समावेश आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...;
गुजरात निवडणूकीसाठी भाजप, आप आणि काँग्रेस या तीन्ही पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातच आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसने गुजरात निवडणूकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
काँग्रेसने गुजरात निवडणूकीसाठी जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत गांधी कुटूंबासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि देशभरातील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या 40 स्टार प्रचारकांच्या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, राजस्थाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, कमलनाथ, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवाजीराव मोघे, नसिम खान, रामकिशन ओझा या नेत्यांचा समावेश आहे.
याबरोबरच या यादीत रमेश चेन्नीथला, तारिक अन्वर, बी.के. हरिप्रसाद, मोहन प्रकाश, शक्तिसिंग गोहिल, डॉ. रघू शर्मा, जगदीश ठाकोर, सुखराम राठवा, सचिन पायलट, भरतसिंग सोलंकी, अर्जुन मोडवाडिया, सिद्धार्थ पटेल, अमित चावडा, नरेनभाई राठवा, जिग्नेश मेवानी, इम्रान प्रतापगढी, कन्हैय्या कुमार, कांतिलाल भुरिया, राजेश लिलोथिया, परेश धनानी, विरेंदरसिंग राठोड, उषा नायडू, बी.एम. संदीप, अनंत पटेल, अमरिंदरसिंग राजा व इंद्रविजयसिंग गोहिल यांचाही समावेश आहे.
गुजरात निवडणूकीच्या 182 जागांसाठी 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. याची मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे.