एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आले आहे. ठाकरे सरकारकडे आता बहुमत नाही असा दावा विरोधी पक्षातील काही लोकांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या सोबत वीस आमदार असल्याची चर्चा आहे.. त्यामुळे विरोधी पक्षांनी ठाकरे सरकार अल्पमतात आल्याची टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विट करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे, तसेच राजीनाम्याची मागणी केली आहे.
"एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही."
असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 21, 2022