आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा एकनाथ शिंदेंना भारी पडतेय का?

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-07-28 15:48 GMT
आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा एकनाथ शिंदेंना भारी पडतेय का?
  • whatsapp icon

राज्यातील सत्तांतरानंतर सगळीच राजकीय समीकरण बदल असताना राज्यव्यापी दौऱ्यांना वेग आला आहे. आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने बंडखोर शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे ठाकरेंच्या `शिवसेनेला` शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे `शिवसेना पक्ष` असं नाव धारण करुन आदित्य ठाकरेंच्याच निष्ठा यात्रा मार्गाने शिवसेना-पक्ष जाहीर सभेचा कार्यक्रम आल्यानं राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहे.

विशेष म्हणजे सुप्रिम कोर्टात बंडखोर आमदारांचे प्रकरण प्रलंबित असताना राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार रखडला आहे. दरम्याने शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई सह महाराष्ट्रभरात दौरे आणि संपर्क अभियान हाती घेण्यात आलं आहे. नुकताच युवानेते माजी मंत्री आदित्य ठाकरेनी ठाणे मार्गे नाशिक, नांदगाव, संभाजीनगर, शिर्डी असा दौरा केला होता. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंना मिळालेला प्रतिसाद पाहून बंडखोर गटामधे अस्वस्थता वाढली होती.

मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी दिल्ली दौरे करुनही एकनाथ शिंदेच्या पदरात काहीच पडलेले नाही. कालच त्यांनी शिदे गटाच्या शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे दिपक केसरकर यांनी प्रवक्त तर आ. बालाजी किणीकर यांना खजीनदार पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

राज्यातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन दिवसाचा दौरा आखला आहे. या दौऱ्यामधे ठाणे मार्ग नाशिक -मालेगाव- मनमाड-वैजापूर- संभाजीनगर- सिल्लोड- संभाजीनगर असा दौरा निश्चित केला आहे. या दौर्यात शासकीय बैठकांबरोबरच बंडखोर आमदारांच्या मतदार संघात `शिवसेना- पक्ष`ची जाहीर सभा असा उल्लेख आहे.

त्यामुळे आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी हा रुट निश्चित केल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे MaxMaharashtra ने अधिकृत भारतीय निवडणुक आयोगाच्या संकेत स्थळावर शिवसेनेची नोंदणी पाहीली असता ती `शिवसेना` अशी आढळून आली. सुप्रिम कोर्टाचे आगामी निकाल आणि बदलती राजकीय समीकरणे पाहता शिंदे गट `शिवसेना पक्ष` असा नवा पक्षनिर्मितीसाठी प्रयत्न तर करत नसेल ना अशाही शंकेला वाव आहे. एकंदरीतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि २०१४ च्या विधानसभा लोकसभा निवडणुकांमधे खरी शिवसेना कोण हे ठरणार आहे. या निमित्ताने शिवसेना दुभंगलेल्या दोन गटात मात्र मोठ द्वंद असल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्याचा हा तीन दिवसांच्या कार्यक्रम आल्यानंतर ताबडतोब प्रतिक्रीया उलटल्यामुळे थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयानं हा कार्यक्रम राज्य शाससन किंवा मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिध्द झालेला अधिकृत दौरा नाही अशी सारवासारव केली आहे.




Full View

 


Tags:    

Similar News