मुख्यमंत्र्यांकडच्या अतिरिक्त खात्यांचा भार इतर शिंदे गटातील इतर मंत्र्यांकडे
मुख्यमंत्र्यांकडच्या खात्यांची जबाबदारी इतर मत्र्यांकडे, वाचा कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं?;
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडल्यानंतर मंत्र्यांचे खातेवाटपही झाले. मात्र या खातेवाटपात महत्वाची खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आले. त्यामुळे अनेक मंत्री अपेक्षित खातं न मिळाल्याने नाराज असल्याचीही चर्चा रंगली होती. त्यापार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन आपल्याकडील काही अतिरीक्त खात्यांची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे दिली आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने तब्बल 40 दिवसानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार केला. यात भाजपच्या 9 आणि शिवसेनेच्या 9 मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र यानंतर मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आली नव्हती. अखेर 14 ऑगस्ट रोजी मंत्रीमंडळाचा विस्तार पार पडला. यामध्ये महत्वाची खाती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले होते. त्यानंतर आता अखेर एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे असलेल्या मंत्रीपदाचा कारभार इतर मंत्र्याकडे सोपवला आहे.
मुख्यमंत्र्यांकडील अतिरिक्त खाती कुणाकडे?
- उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान
- दादा भूसे- पणन
- शंभूराज देसाई- परिवहन
- दीपक केसरकर- पर्यावरण व वातावरणीय बदल
- तानाजी सावंत- मृद व जलसंधारण
- संजय राठोड- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
- संदीपान भुमरे- अल्पसंख्याक विकास मंत्री
- अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन
खातेवाटपाच्या वेळी जाहीर करण्यात आलेले खाते-
- सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
- गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
- संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
- सुरेश खाडे- कामगार
- संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अब्दुल सत्तार- कृषी
- दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
- अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
- मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील खात्याची जबाबदारी इतर 8 मंत्र्यांकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यामागे सर्व महत्वाची खाती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच असल्याने विरोधक या मुद्द्यावरून सरकारला घेरू शकतात. त्यामुळेच अधिवेशनाला सुरूवात होण्यापुर्वीच मुख्यमंत्र्यांकडील खात्यांची जबाबदारी 8 मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.