...आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अश्रूंचा बांध फुटला

Update: 2022-07-04 13:01 GMT

 सध्या विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. त्याच्या अखेरच्या दिवशी विश्वास दर्शक ठराव भाजप आणि शिंदे गटाच्या युतीने जिंकला. या निमित्ताने आमदारांसाठी आभार प्रदर्शनाचं भाषण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 

विधानसभेच्या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये म्हाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. सगळ्यांची भाषण आटोपल्यावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी य आभार प्रस्तावाच्या भाषणाला सुरुवात केली. त्यांच्या या भाषणात सुरुवातीला त्यांनी स्वतःचा राजकीय प्रवास सांगितला. 

या दरम्यान त्यांना त्यांच्या दोन दिवंगत मुलांची आठवण आल्याशिवाय राहिली नाही. ती  आठवण सांगताना त्यांना गहिवरून आल. अखेर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. काही क्षण ते स्तब्ध झाले आणि मग तेयानी त्यांच्या पुढच्या भाषणाला सुरुवात केली. ही आठवण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटात देखील दाखवण्यात आली आहे. 

त्यानंतर गेल्या दोन दिवसांमध्ये जे जे आरोप इतर नेत्यांनी त्यांच्यावर केले त्या सगळ्यांना त्यांनी भाषणामध्ये चोख प्रत्युत्तर दिली. यावेळी त्यांनी संजय राऊत, आदित्य ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील छगन भुजबळ, या सगळ्यांच्या प्रश्नांची चोख उत्तरे दिल्याचं पाहायला मिळालं....आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अश्रूंचा बांध फुटला

Tags:    

Similar News