उध्दव ठाकरेंनी (Uddhav Thakare) हा अर्थसंकल्प गाजराचा हलवा दिला अशी टीका केली. पण अरे आम्ही गाजराचा हलवा तरी दिला. तुम्ही तर फक्त गाजरं हलवून दाखवत राहिलात अशा खरपूस शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उध्दव ठाकरेंवर शरसंधान केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.19 मार्च) खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदावर बोलतान शिंदे म्हणाले, तुम्ही म्हणाला होतात की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणालात पवारांनी सांगितलं की तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल. पण या प्रक्रियेत असणारे सगळे लोक माझ्या परिचित होते. तुम्हाला सत्तेचा मोह झाला. तुम्हाला खुर्चीची भुरळ पडली. तुम्ही ते वदवून घेतलंत. आनंद आहे. पण तुम्ही जेव्हा हिंदुत्वाबद्दल मूग गिळून गप्प बसलात, सावरकरांचा विषय आला, दाऊदचा विषय आला, हिंदुत्वाचे विषय जेव्हा आले,
तेव्हा तुम्ही भूमिका बदलू लागलाग. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हायलाही तुमची जीभ कचरू लागली, यापेक्षा दुर्दैवं अजून काय असू शकतं? असं ते म्हणाले.
तुम्ही बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार आहात. पण विचारांचा वारसा तुम्ही सोडलात. आम्हाला तुमची संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. मला पत्रकारांनी विचारलं की शिवसेना मिळाली, धनुष्यबाण मिळालं., तुम्ही त्यांच्या मालमत्तेवर दावा सांगणार का? बिलकुल नाही.
तुम्ही खोके, गद्दार म्हणून किती पाप झाकणार? बाळासाहेब ठाकरे तुमचे वडील होते हे किती वेळा सांगणार? हे जगाला मान्य आहे. पण बाळासाहेब तुमचे वडील असले, तरी ते सगळ्या शिवसैनिकांचं दैवत होते. तुम्ही त्यांना वडील म्हणून छोटं करू नका महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
माणसाला स्वत:च्या नेतृत्वावर विश्वास असायला हवा. किती लोक घालवलेत असा थेट आरोप उध्दव ठाकरेंवर करत नारायण राणे, राज ठाकरे, गणेश नाईकांपासून सगळे गेले. रामदास कदम, मलाही तुम्ही असंच केलं. जेव्हा स्वार्थ डोक्यात जातो, सत्तेची हव्यास जाते तेव्हा त्याला काहीह दिसत नाही. सुचत नाही. हा एकनाथ शिंदे आज, काल आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. राज ठाकरे काय म्हणत होते? जिथे शिवसेना कमजोर आहे,. तो भाग मला द्या. मी शिवसेना वाढवतो.,
मोठी करतो. नारायण राणेंच्या बाबतीत काय झालं याचेही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. आता तर आम्हाला सगळे भेटतात. बोलतात. पूर्वी आमच्यावर बंधनं होती, आता आम्ही मोकळे आहोत. ठाण्याच्या महापौरपदाची निवडणूक होती, तेव्हा मी राज ठाकरेंना सांगितलं की हा भगवा उतरू देऊ नका. राज ठाकरेंनी विनंती मान्य केली आणि आम्हाला पाठिंबा दिला. आमचं काय चुकलं? पण तेही तुम्हाला पटलं नाही. शेवटी बाळासाहेबांनी सांगितलं की हा एकनाथ स्वत:साठी गेला नाही, ठाण्यातला भगवा उतरू नये म्हणून गेला. कसा पक्ष पुढे जाणार? असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
रामदास कदम म्हणाले की हा झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी. आता जास्त काम करावं लागतं. मी रात्री १२-१ वाजताही अधिकाऱ्यांना फोन करतो. तेही फोन उचलतात. कारण त्यांना माहिती आहे की हा मुख्यमंत्री रात्रीचा जागतो. आता सायलेंट सरकार नाही, अलर्ट सरकार आहे. सगळे अलर्ट मोडवर आहे, असं एकनाश शिंदे शेवटी म्हणाले.