शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांच्यासह ४० आमदारांना भाजप (BJP ) सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) यांनी चंद्रपूरमध्ये पत्रकारांना ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना ( shivsena ) आणि भाजप एकत्र निवडणुका लढती, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे. तसेच याआधी मिळाले नसेल त्यापेक्षा जास्त यश या सरकारला प्राप्त होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.