हिवाळी अधिवेशनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे आमने सामने ...

Update: 2022-12-18 09:29 GMT

उद्या नागपुर मध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे . राज्यात दोन वर्षानंतर नागपुरात अधिवेशन होणार आहे , हे अधिवेशन वादळी ठऱण्याची शक्यता आहे . या अधिवेशनात घेरण्यासाठी विरोधीपक्षाक़डुन विशेष तय़ारी करण्यात आली आहे . सध्या राज्यात सुरु असलेले वाद व विविध मुद्दे घेऊन विरोधक सरकारला घेरण्याची तयारी करण्यात आली आहे . यामुळे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यादा हिवाळी अधिवेशन होत आहे . हिवाळी अधिवेशनादरम्यान बाळासाहेबाची शिवसेना व शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे दोनी गट आमने सामने य़ेण्याची शक्यता आहे . उद्या नागपुर मध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे .या अधिवेशनाला उध्दव ठाकरे उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे आमने सामने येण्याची शक्यता असुन हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे .

राज्यात महापुरुषावरुन राजकीय वातावरण तापले असताना राज्यपालाची वादग्रस्त वक्तवे ,सीमाप्रश्न , उद्योग या प्रश्नाचे प़़डसाद अधिवेशनात उमटणार आहेत . म्हणुन हिवाळी अधिवेशन गाजणार असल्याच्या चर्चा आहेत .

विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि अंबादास दानवे हे दुपारी पत्रकार परिषदेमध्ये त्यांची भूमिका जाहीर करतील. सरकारच्या वतीने बोलावण्यात आलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकतील की चर्चेला जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संध्याकाळी पत्रकार परिषदेतून विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देतील.

Tags:    

Similar News