राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ जागांवर कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू झाली आहे. पण आता या जागांवर भाजप आणि शिंदे गटातील लोकांची वर्णी लागेल शकते असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आपल्याकडे १२ जागांसाठी बाराशे लोकांनी संपर्क केल्याचे सांगत फडणवीस यांनी सगळ्यांचे समाधान करणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर युतीचे सरकार असल्याने सगळ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान देणे शक्य होणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.