आमदार संजय राठोड यांना क्लीन चिट; विशेष चौकशी पथकाने नोंदवला होता जबाब
"आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचं पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला हे यवतमाळ पोलिसांनी शोधून काढावं" असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. यावरून आता राजकीय ट्विटर वॉर सुरू झाले आहे.;
यवतमाळ : "आमदार संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचं पत्र जर खोडसाळपणा असेल तर तो कुणी व का केला हे यवतमाळ पोलिसांनी शोधून काढावं" असं म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी 'नेमकं संजय राठोडच्याचं केसमध्ये ते निरपराध कशा पद्धतीत आहेत हे सांगायचा याआधी ही प्रयत्न झालाय व आता ही अगदी तेचं…आश्चर्य वाटण्यासारखं काहीचं नाही' अशी टीका वाघ यांनी ट्विटरवरून केली आहे.
घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने घाटंजी पोलिस व पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठविले होते. त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली होती. सदर तक्रार आपण केली नाही. सही माझी नाही. आमदार संजय राठोड यांच्याविरुद्ध कोणतीही तक्रार केली नाही, असे महिनेने आपल्या जबाबात म्हटले आहे.
अशी माहिती यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून आमदार राठोड यांनी देखील ट्विट करत 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं' असं प्रत्युत्तर दिलं आहे. सोबतच काल पासून स्थानिक पोलिसांना पोस्टाने मिळालेल्या एका पत्रावरून समाजमाध्यमे व प्रसार माध्यमे ह्यावर उलट सुलट बातम्या प्रसारित करत आहे. हे प्रकरण मी संचालक असलेल्या शिक्षण संस्थेशी संबंधित असून ते प्रकरण माननीय उच्च न्यायालयात न्याय प्रविष्ठ आहे.
हे प्रकरण खरे तर चार वर्षापूर्वीचे आहे पण गेल्या तीन महिने पासून एका राजीनामा दिलेल्या शिक्षिकेतर्फे नोकरीवर परत घेणे बाबत तसेच माझे राजकारण संपवून टाकण्याबाबत मला विविध मोबाईल क्रमांकावरून धमक्या दिल्या गेल्या आहेत.सदर प्रकरणात माझे तर्फे दिनांक 24 मे 2021 व 28 जुलै 2021 ला पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे.हे प्रकरण वैयक्तिक स्वार्थासाठी जाणून- बुजून माझी प्रतिमा डागाळण्यासाठी माझे राजकीय विरोधकांना हाताशी धरून उभे केले आहे.माझे दोन्ही तक्रारींवर पोलीस तपास करीत आहेत त्यात सत्य समोर येईलच.असं आमदार संजय राठोड यांनी ट्विट करून म्हटले आहे.