Chinchwad Bypoll : चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांचे शक्तीप्रदर्शन, निवडणूक अर्ज दाखल
चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पोटनिवडणूकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यापार्श्वभुमीवर पतीच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांनी चिंचवड पोटनिवडणूकीत शक्तीप्रदर्शन केले आहे.;
भाजपाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर तिथे विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. आज या पोटनिवडणूकीच्या निमित्ताने भाजपच्या उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणूकीत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचा भाजपने (BJP) उमेदवारी जाहीर केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या समन्वयाने ही उमेदवारी देण्यात आल्याचे भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी सांगितले. आज अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. संपूर्ण चिंचवडची जनता ही जगताप यांच्या घराबाहेर उपस्थित होती. निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी घरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये सर्व जगताप समर्थकांनी सहभाग घेतला होता.
मी माझ्या आयुष्यामध्ये एवढी मोठी रॅली कधीच पहिली नाही, अशी प्रतिक्रीया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावेळी दिली. अश्विनी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरीता आज चिंचवडमधील संपूर्ण जनसमुदाय मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी झाला असल्याची प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. अश्विनी जगताप यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, या दुःखद प्रसंगी हा अर्ज भरण्याची वेळ आली आहे. ६ किलोमीटरच्या या रॅलीत न सांगता इतके लोक आले. हिच लक्ष्मण जगताप यांची कमाई आहे. काही सुविधा नसताना देखील लोक आमच्या सोबत आहेत. स्वखुशीने सगळे आमच्या सोबत आले आहेत, हिच लक्ष्मण जगताप साहेबांची पुण्याई असल्याचे मत अश्विनी जगताप यांनी व्यक्त केले. अर्ज दाखल करताना नागरिकांनी घोषणा देत या रॅलीत सहभाग नोंदवला. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांच्या उपस्थितीने अश्निनी जगताप यांचा विजय निश्चित असल्याचे म्हटले जात आहे.