मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इलेक्ट्रिक 'बेस्ट'च्या बसेसचं लोकार्पण

Update: 2021-08-08 07:56 GMT

मुंबईतील वाढती गर्दी, पर्यावरणाच होत असले प्रदुषण, पेट्रोल डिजेलचे वाढते भाव, महागाई असे सर्व विषय लक्षात घेत. बेस्टच्या पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बसेसंचां शुभारंभ झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला .

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बेस्टच्या वर्धापन दिनी मनःपूर्वक शुभेच्छा देत . सर्व वाहक-चालक, बेस्ट कर्मचारी यांना त्यांच्या सेवेबद्दल धन्यवाद देतो व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. करोनाच्या काळात बेस्टने अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच प्रवासी यांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली.त्यांनी परिस्थितीला तोंड देत कुठेही अडचण येऊ दिली नाही. जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केली. करोना काळात बेस्ट अधिकारी आणि कर्मचारी देखील करोनाग्रस्त झाले, काहींचे मृत्यू झाले पण तरीदेखील बेस्ट थांबली नाही.

कोरोना कोळात बेस्ट मुंबईची जीवनवाहिनी

कोरोना कोळात बेस्ट ही सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी बलनी आहे. सद्या पर्यावरणा ची मोठी हानी होत आहे त्यातच निसर्गचक्र बदलते आहे. आपलं पर्यावरण जपलं गेलं पाहिजे. इलेक्ट्रिक बस हे बेस्टचे क्रांतिकारक पाऊल आहे. माहीम बस डेपोचे आधुनिकीकरण आल्याने देखील कर्मचाऱ्यांना मोठी सुविधा होणार आहे.." असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.

याचबरोबर, "आम्ही आमच्या वचननाम्यात म्हटलं होतं त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या बेस्ट बस आणि लोकल प्रवासासाठी एकच पास किंवा तिकीट यापुढे चालावे असे नियोजन शिस्तबद्ध सेवा ही बेस्टची ख्याती आहे. हळूहळू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. कोरोनाचे निर्बंध आपण सावधगिरी बाळगत शिथिल करतो आहोत." असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.यावेळी मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसच्या उपक्रमांचं कौतुक केलं.

Tags:    

Similar News