काँग्रेस सोडण्यासाठीच सत्यजित तांबे यांचे आरोप, छगन भुजबळ यांचा गंभीर आरोप
सत्यजित तांबे यांनी विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच काँग्रेसमधील वादात छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे.
सत्यजित तांबे (Chhagan Bhujbal) यांनी काँग्रेसविरोधात बंड करून नाशिक पदवीधर निवडणूक अपक्ष लढवली आणि जिंकलीसुध्दा. मात्र यानंतर सत्यजित तांबे (satyajeet Tambe) यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून छगन भुजबळ यांनी सत्यजित तांबे यांना लक्ष केले आहे.
सत्यजित तांबे म्हणाले, आम्हाला दोन एबी फॉर्म दिल्याचे म्हटले जात आहे. मात्र हे फॉर्म चुकीचे होते. आम्हाला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. हे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि तांबे कुटूंबियांना बदनाम करण्याचे षडयंत्र महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसकडून सुरु आहे, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रीया देतांना छगन भुजबळ म्हणाले, डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात चांगले काम केले आहे. त्यातच जे ऐनवेळी झालं ते चुकीचं झालं. मात्र या सगळ्या प्रकरणाचा अजूनही उलगडा झाला नाही. त्यामुळे चुकी कुणाची हे स्पष्ट झालं नाही. परंतू शिवसेना आणि महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठींबा दिला होता. शुभांगी पाटील यांना चांगली मतं मिळाली. मात्र एबी फॉर्मच्या बाबतीत सत्यजित तांबे यांनी काँग्रेस (Congress) प्रदेश नेतृत्वावर टीका केली. परंतू अशा प्रकारे फॉर्म न पाहता एबी फॉर्म कोण घेतं? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले, फॉर्म घेतांना सर्व काही पाहिले जाते. परंतू सत्यजित तांबे यांना काँग्रेस सोडयची असेल त्यामुळे ते आरोप करीत आहेत. मात्र आता बाळासाहेब थोरात यांनी बोललं पाहिजे. कारण बाळासाहेब थोरात हेच खरं काय ते सांगू शकतात, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.