छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वाद पेटला, राज ठाकरे यांच्या आरोपांना छगन भुजबळ यांचे उत्तर

शरद पवार हे छत्रपती फक्त शाहू फुले आंबेडकर यांचेच नाव घेतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नसल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. त्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.;

Update: 2023-05-08 03:47 GMT

शरद पवार (Sharad pawar) यांची भाषणं काढून पहा. ते कधी छत्रपती शिवरायांचं नाव घेतात का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला होता. शरद पवार हे फक्त शाहू, फुले, आंबेडकर यांचेच नाव घेत असल्याचीही टीका केली होती. त्यावरून आता वाद पेटला आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उत्तर दिले आहे. (Raj Thackeray criticize to Sharad pawar)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे कधी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही अशी टीका रत्नागिरीच्या सभेत राज यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राला एकत्रित ठेवण्यासाठी फुले, शाहू,आंबेडकर हे महत्त्वाचे आहेत. प्रबोधनकार ठाकरे यांनी बरेचसे काम यांच्यावर केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव घेणे वावगे काय आहे. शरद पवार हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात, त्यावर बोलतात. मात्र राज ठाकरे हे फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव का घेत नाही ? असा सवाल छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे. (Chhagan Bhujbal Answered to Raj Thackeray )

छगन भुजबळ नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांचा चांगला समाचार घेतला. मी शरद पवारांसोबत 1991 पासून सोबत आहे. पवार हे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या विषयी बोलतात, सांगतात इतिहासाची उजळणी देखील करतात.

प्रबोधनकार ठाकरे (Prabodhankar Thackeray) यांनी देखील फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार समाजासमोर पुस्तकाच्या माध्यमातून मांडले. ही पुस्तके माझ्या संग्रही आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तर बिघडते कुठे? असा टोला राज यांच्यावर छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

Tags:    

Similar News