चंद्रशेखर बावनकुळे यांना झटके येत आहे, रुपाली पाटील ठोंबरे यांची टीका

Update: 2022-10-21 06:30 GMT

चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि काँग्रेसवर सातत्याने टीका करत आहेत. त्यावर प्रत्युत्तर देतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali patil Thombare) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे टीका करताना काँग्रेस (Congress), शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या पक्षांच्या निवडणूक चिन्हांवरून टीका केली होती. यावेळी बावनकुळे म्हणाले होते की, अरबी समुद्राच्या पाण्याने मशाल विझवणे, राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पाडणे आणि पंजा साकुलीत थांबला पाहिजे अशी टीका केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

रुपाली पाटील म्हणाल्या की, बावनकुळे यांना सातत्याने झटके येत आहेत. त्यामुळे त्यांनी तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. याबरोबरच रुपाली पाटील म्हणाल्या की, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. दिवाळीआधी अन्नधान्याची कीट मिळाली पाहिजे, असे महत्वाचे प्रश्न न सोडवता त्यांना जे झटके येत आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याची खोचक टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी लगावली. 

Tags:    

Similar News