शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नकतेच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडु यांना पत्र लिहुन ईडी आपला छळ करत असल्याचे म्हटले आहे.महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्याचा आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. दरम्यान दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांना जाहीर आव्हान दिलं होतं.यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात १० मार्च नंतर राज्यात भाजपाचे सरकार येईल,असं त्यांनी म्हटले आहे.कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्याची चर्चा सुरु आहे.
या व्यक्तव्याबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी या वाक्याची सारवासारव केली. कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती.कार्यकर्त्यांनी किरिट सोमय्यांच्या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली होती.राज्यात सत्तेचा दुरुपयोग चालला आहे.पुणे निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर मेळाव्यात राज्यात १० मार्च नंतर भाजपाचे सरकार येईल. असं कार्यकर्त्यांचं मन राखण्यासाठी म्हणालो होतो.
कार्यकर्त्यांनी त्यांची अस्वस्थता मांडली.त्यांना काळजी करु नका असं सांगत १० मार्चला उत्तर प्रदेशमध्ये निकाल लागल्यानंतर सरकार येईल असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.काल लागल्यानंतर सरकार येईल असं म्हटल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. कार्यकर्त्यांकडून तक्रारी आल्या की आम्हाला त्रास होतोय. तेव्हा १० मार्चनंतर महाराष्ट्रात सरकार बदल होईल काही काळजी करू नका असं म्हटलं. एखाद्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे होणारा डिस्टर्बन्स वाटत असतो त्यावेळी असं म्हणायचं असतं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सारवासारव केली.