मिलिंद नार्वेकर ED च्या रडारवर; चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर ED च्या रडारवर, चंद्रकांत पाटील यांची माहिती...;

Update: 2021-07-17 10:49 GMT

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती असलेले परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची नावे सध्या चर्चेत आहे. दोघांच्याही बंगल्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली

राज्यात ED कोणत्या नेत्यावर कारवाई करते? कुठं छापेमारी करते यावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणादणले आहेत. अनिल देशमुख, एकनाथ खडसे, प्रताप सरनाईक या नेत्यांची वेगवेगळ्या प्रकरणात ED कडून कसून चौकशी सुरू आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांची देखील नावे चर्चेत आहे.

दोघांच्याही बंगल्याची चौकशी सुरू आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव असून त्यांची चौकशी सुरू असल्याचं पाटील यांनी सांगितल्यामुळं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की ,आज रात्री एका बड्या नेत्याला अटक होऊ शकते, असं शुक्रवारी म्हणालो होतो. त्यावरून अंदाज लावले जात होते. आपल्या बोलण्याचा रोख कोणाकडे होता असं पाटील यांना आज विचारलं असता, त्यांनी खुलासा केला.

'अनेकांच्या चौकशा सुरू आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या निमित्तानं इतर कारखान्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी मी स्वत: केलीय. यापूर्वी अण्णा हजारेंनीही अशी मागणी केलीय. अनिल देशमुख यांची मालमत्ता ईडीनं सील केलीय. हे सगळं सुरू असल्यानं एका नेत्याला अटक होईल असं यावेळी पाटील म्हणाले.

Tags:    

Similar News