देवेंद्र फडणविसांचा धंदा काय? चंद्रकांत खैरे यांचा सवाल
कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील राजकारणांमध्ये वाद-प्रतिवादांचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (chandrakant khaire) यांनी फडणवीसांचा धंदा काय? असे वक्तव्य केलं आहे.;
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांवर ठाकरे ( uddhav Thackeray) गटातील नेते व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र दिसुन येत आहे. भाजपाला पराभुत करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं मत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
खैरे यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये पत्रकारांशी संवाद साधतांना, शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल बोलण्या इतका मी मोठा नसून शरद पवारांनी घेतलेला निर्णय त्याच्या दृष्टीने योग्य असू शकतो, असे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी पुन्हा एकत्र आली तर भाजपचा(BJP) पराभव हमखास होईल. हे फडणवीसांना माहीत आहे, म्हणून ते आमच्या मध्ये फुट पडण्याचा प्रयत्न करत आहेत. फडणवीस हे एकदम चाणक्य माणूस आहेत. धार्मिक गोष्टींवर बोलणं हा त्यांचा धंदा आहे. आणि हे मला कधीच जमणार नाही असे देखील खैरे म्हणाले आहेत.
खैरे यांनी फडणवीसांसोबतच मोदींच्या (Narendra Modi) देखील खोट्या आश्वासनांची पोल खोलली आहे. 2014 पासून 15 लाख रुपयांचे खोटे आश्वासन मोदीं देत होते. आतापर्यंत केलेल्या आश्वासनांची मोदींनी पूर्तता केली नाही. त्यामुळे भाजपावरील विश्वास लोकांच्या मनातून उतरला आहे.