हे दडपशाहीचे सरकार आहे जे विरोधात बोलते त्यांना नोटीस येते : सुप्रिया सुळे

Update: 2022-06-14 07:23 GMT

केंद्रात दडपशाहीचे सरकार आहे. जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते. मंदिरात मी कधीही मागायला येत नाही, तर आभार मानायला येते असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे या सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यांनी अंबादेवी आणि एकविरा मंदिर अमरावती मी मंदिरात कधीही मागायला येत नाही, तर आभार मानायला येते असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत मला वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही. मी एक खासदार आहे आणि एका संघटनेत काम करते, असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

जर या देशातील नवीन पिढीला नोकऱ्या मिळणार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निर्णयाचं स्वागत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केल. केंद्र सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 10 लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावर सुप्रिया सुळेंना विचारला असता त्या बोलत होत्या. यावेळी सुळे यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. हे दडपशाहीचं सरकार आहे, जे विरोधात बोलतात त्यांना नोटीस येते असे त्या म्हणाल्या.

विधान परिषद नंतर सरकार कोसळेल या भाजपच्या दाव्यावर सुप्रीया सुळे यांची टीका गेल्या अडीच वर्षांपासून तारखा देत आहे.आणखी एक तारीख. राष्ट्रवादी अजिबात संजय राऊत यांच्या वर नाराज नाही..कालच संजय राऊत आणि देवेंद्र भुयार भेटले. खूप छान फोटो निघाले असही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारी नोकरी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. सरकारकडून बंपर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 10 लाख पदांवर भरती करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या सरकारी विभागांमध्ये अनेक सरकारी पदं रिक्त आहेत. त्यामुळे मोदी सरकार आता मिशन मोडमध्ये आलं असून पुढील दीड वर्षामध्ये सरकार नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करुन देणार आहे.

Tags:    

Similar News