PM Liz Truss Resign : आश्वासनं पुर्ण करु न शकल्याने पंतप्रधानांचा राजीनामा

अवघ्या 45 दिवसात ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. पण कारण काय आहे जाणून घेण्यासाठी वाचा....

Update: 2022-10-20 15:45 GMT


UK PM Liz Truss Resign : बोरीस जॉन्सन (Boris Johnson)यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत लिझ ट्रस (Liz Truss) या ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या. मात्र अवघ्या 45 दिवसांतच लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

बुधवारी ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर गुरुवारी ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (PM Liz Truss) यांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

राजीनामा देण्याचे कारण

मी पंतप्रधान पदाच्या निवडणूकीत जी आश्वासनं दिली होती ती पुर्ण करू शकले नाही. त्यामुळे मी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचे लिझ ट्रस (Liz Truss) यांनी राजीनामा देतांना सांगितले. तसेच लिझ ट्रस यांनी हुजूर पक्षाच्या (Conservative party) सदस्यत्वाचाही राजीनामा दिला.

लिझ ट्रस म्हणाल्या, मी जेव्हा ब्रिटनची पंतप्रधान बनले. त्यावेळी देशात आर्थिक अस्थिरता नव्हती. मात्र ब्रिटनमधील नागरिकांना वीजेची बिलं (Electricity bill) कशी भरायची? याची चिंता होती.

आम्ही नागरिकांवर असलेल्या कर कपातीचे स्वप्न पाहिले होते. ब्रिटनची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा पाया रचण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र सध्या ते शक्य नसल्याने मी माझ्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचे लिझ ट्रस यांनी सांगितले.

लिझ ट्रस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात महागाई( Inflation) आणि करवाढ रोखण्यासाठी पावलं उचलली होती. त्यामुळे नागरिकांना त्यांच्याविषयी आशा निर्माण झाली होती. मात्र ट्रस यांच्या सरकारने उचललेली पाऊलं तातडीने मागे घेतली. त्यामुळे हुजूर पक्षातील नेते त्यांच्यावर संतापले होते. त्यातच आपण दिलेली आश्वासनं पुर्ण करणे शक्य नसल्याचे जाणवल्याने लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर युगुव्ह या संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हुजूर पक्षाच्या 530 सदस्यांपैकी 55 टक्के सदस्यांनी लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच दुसऱ्या एका संस्थेच्या सर्वेक्षणामध्ये लिझ ट्रस यांच्या सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, असा हुजूर पक्षातील नेत्यांचे मत होते. त्यानुसार अखेर लिझ ट्रस यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे.

लिझ ट्रस यांच्या राजीनाम्यानंतर पुढं काय?

लिझ ट्रस यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर नव्या पंतप्रधानांची निवड पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पंतप्रधान निवडीपर्यंत मी या पदावर कायम राहील असंही लिझ ट्रस म्हणाल्या आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा बोरीस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डंट यांची नावं चर्चेत आले आहेत.

ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचे राजीनामा पत्र

Tags:    

Similar News