मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला - चंद्रकांत पाटील

Update: 2021-11-30 13:02 GMT

शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी सर्व पक्ष संपवला, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज गावागावात भाजपची ताकत आहे, स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लागवला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये ते बोलत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या विजयी झालेल्या भाजपच्या उमेदवार- संचालकांचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

राज्यात पार पडलेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपा हा एक नंबरचा पक्ष राहिला आहे,आणि आता गावागावात भाजपाची ताकद वाढली आहे आणि स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत,असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. त्याचबरोबर आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या चिन्हावर लढवल्या जातील, स्थानिक पातळीवर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या जिल्हाध्यक्षांनी प्रदेश अध्यक्ष म्हणून माझ्या बरोबर आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही, असे ठरल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Tags:    

Similar News