मोहम्मद पैगंबरांवर टीका, भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांचे पक्षातून निलंबन
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त टिपण्णीमुळे भाजपने त्यांचे निलंबन केले आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्यामुळे या आक्षेपार्ह टिपण्णीबद्दल भाजपने नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई केली आहे. तर यासंदर्भात भाजपने निवेदन जारी केले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा या एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी या चर्चेदरम्यान नुपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त टिपण्णी केली होती. त्यामुळे देशभरातील मुस्लिम समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर अनेक ठिकाणी नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुस्लिम समाज आक्रमक झाला होता. तसेच देशभरात अनेक ठिकाणी नुपुर शर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे नुपुर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. दरम्यान भाजपने नुपुर शर्मा यांच्यावर सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
भाजपने राष्ट्रीय प्रवक्त्या नुपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करत सहा वर्षांसाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यावरूनही निलंबित केले आहे. नवीन जिंदाल हे दिल्ली भाजपचे मीडिया प्रमुख आहेत. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी नुपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून केलेल्या टीकेमुळे तापलेले वातावरण शांत करण्यासाठी नुपुर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याचे निवेदन जारी केले. त्यामध्ये म्हटले आहे की, भाजप हा सर्व धर्माचा आदर करणारा पक्ष आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या आदरणीय लोकांचा अपमान सहन केला जाणार नाही. त्याबरोबरच अरुण सिंह यांनी म्हटले आहे की, भाजप अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही. तसेच अशा विचारावर विश्वास ठेवत नाही. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या उपासकांचा अवमान भाजपला मान्य नाही. कारण भाजप हा भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात सर्व धर्मांचा विकास आणि भरभराट झाली आहे. त्यामुळे या देशात अशा प्रकारची वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असे अरुण सिंह यांनी निवेदनात म्हटले आहे.