नवी दिल्ली : देशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. नुकत्याच झालेल्या 13 राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये संमिश्र कल पाहायला मिळाला होता. अनेक ठिकाणी भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हिमाचल प्रदेशात भाजपला धक्कादायक निकालांना सामोरं जावं लागलं होतं.
अन्य राज्यांमध्ये देखील भाजपला अपेक्षित यश मिळाले नव्हते. त्यामुळे आजच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मतदारांचा बदलता कल लक्षात घेता नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी कोणती नवी रणनीती आखणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.