उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष निर्माण झाल आहे. MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्याचा सपाटा लावला आहे. यावरूनच शिवसेनेने सामनातून ओवेसींवर निशाणा साधला आहे. 'फोडा-झोडा व जिंका' असं म्हणत सामनातील अग्रलेखामधून ओवेसी यांच्या भूमिकेवर शंका व्यक्त करण्यात आली आहे. भाजपच्या यशस्वी वाटचालीचे पडद्यामागचे सूत्रधार मियाँ असदुद्दीन ओवेसी व त्यांचा पक्ष चांगलाच कामाला लागल्याचे दिसत आहे, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती. युपीतील विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याची पूर्ण तयारी ओवेसी महाशयांनी केलेली दिसते, असं म्हणत सामनातून ओवेसी हे भाजपासाठीच काम करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
पण शिवसेनेच्या य़ा आरोपाला आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उत्तर दिले आहे. "ओवेसीला आलिंगन घालून मालेगाव व अमरावतीत सत्तेच्या इदीचा नजराणा तुम्ही पेश केला होता. आता 'जनाब राऊत MIM की मुहब्बत कौन है?'हे #महाराष्ट्राला माहितीये.#महाआघाडीचे मदारी डमरू वाजवतात आणि कोलांट्या उड्या मारता.हे रोजच मनोरंजन बंद करा." असा टोला लगावण्यात आला आहे.