मुख्यमंत्र्यांच्या आजी माजी सहकारी या वक्तव्यावरून शिवसेना-भाजप एकत्र येणार का अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं, पण आत्ताच तशी शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सेना-भाजप भविष्यात एकत्र येऊ शकतात असे संकेतही फडणवीस यांनी दिले आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मांडली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात कधीही युती होऊ शकत नाही असा दावा अतुल भातखळकर यांनी केलेला आहे.