भाजप नेते करणार ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार...

Update: 2021-01-06 06:04 GMT

निवडणूक ग्रामपंचायतची असो की, लोकसभेची भाजप गांभीर्याने निवडणूकीला सामोरं जाते. मंगळवारी राज्याची राजधानी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी टी रवी, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, संजय कुटे यांच्यासह सहप्रभारी ओमप्रकाश धुर्वे, जयभान सिंग पवैया, संघटन सरचिटणीस विजयराव पुराणिक देखील उपस्थित होते.

या बैठकीत सध्या राज्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजप नेत्यांनी ग्राउंड लेव्हलला जाऊन प्रचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच राम मंदिर निधी, कार्यालय निर्माण या मुद्द्यांसह विधानपरिषद निवडणूकांची समीक्षा करण्यात आल्याची माहिती आहे.

Tags:    

Similar News