मुलुंड : भाजप नेते किरीटी सोमय्या यांनी मुलुंड पोलीस स्टेशन येथे पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी दसराच्या दिवशी निवासस्थानी ,कार्यालय परिसरात केलेल्या तोडफोडी विरोधात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान यावेळी बोलताना सोमय्या म्हणाले की, पोलीस आणि महापालिका दोघांनीही कबूल केल आहे की , आमच्याकडे कोणतीही कायदेशीर आदेश नव्हता आम्ही विदाऊट एनी सिक्युरिटी कन्सेंट परमिशन तुमच्या परिसरात घुसलो. म्हणून दोघांनीही बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल याच्या संबंधात पोलिसांत एफआयआर रजिस्टर करून पोलिसांनी दोन्ही संबंधित अधिकारी त्यांच्यासह अर्धा डझन गुंड या विरोधात कारवाई करावी,असं सोमय्या म्हणाले.
सोबतच ते म्हणाले की, माझी माहिती अशी आहे की, सत्ताधारी पक्षांचे दोन गुंड सुद्धा त्यांच्यासोबत होते. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर कार्यालयाची नासधूस केली असती, म्हणून मला याबाबत चौकी आणि कारवाई झाली पाहिजे.
त्याचबरोबर 19 सप्टेंबरला हेच मुलुंड नवघर पोलिसांनी गैरकायदेशीर सहा तास कोंडून ठेवलं, त्याचीही तक्रार या पोलीस स्टेशन केली होती. 19 सप्टेंबरला आज एक महिना झाला. काहीही केलं नाही, सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांनी तक्रार,एफआयआर रिजेक्ट करावी. पण , मुंबई पोलिसांनी त्याची चौकशीही केली नाही, पोलिसांची माफिया गिरी मी खपून घेणार नाही असं सोमय्या म्हणाले.
एका महिन्याच्या आत दखल घेऊन कारवाई करायची असते, सुप्रीम कोर्टानुसार सात दिवसाच्या आत जर पोलिसांनी कारवाई केली नाही, दखल घेतली नाही तर पोलिसांविरोधात कारवाई करण्यासाठी माझा मार्ग मोकळा मोकळा आहे.
ठाकरे सरकारची ही गुंडगिरी आहे, हे सरकार पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग करत आहेत. ठाकरे- पवार यांच्या माफिया गिरीला किरीट सोमय्या दमडीचं घाबरत नाही. माफियागिरी करणाऱ्या पोलिसांना , महापालिका इंजिनियरला सोडणार नाही. त्यांना मी धडा शिकवणार असं सोमय्या म्हणाले.
सोबतच अजित पवार असो शरद पवार असो पार्थ पवार असो ते जर घोटाळे करत असतील तर पहिले उत्तर त्यांनी द्यावी. आम्हाला माहिती कुठून मिळते हे महत्त्वाचं नाही. जरंडेश्वर कारखान्यात हजार कोटींची गुंतवणूक कशी? त्याचे उत्तर द्या. हल्ली पवार परिवार हे ड्रग माफियांचे प्रवक्ता झाले आहेत असा घणाघात सोमय्या यांनी केला.