चंद्रशेखर बावनकुळेंची अजित पवारांवर टीका...

अजित पवार यांना चिंचवड पोटनिवडणुकीत ४४० चा करंट देण्याची भाषा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. पुन्हा पवार कधीच चिंचवडमध्ये फिरकले नाही पाहिजेत, असे थेट आव्हानच पवारांना देण्यात आले आहे. नक्की ही काय आहे हे आव्हान वाचा...;

Update: 2023-02-17 09:53 GMT

चिंचवड आणि कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोरदारपणे सुरवात केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथे एका बैठकीत बोलताना अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. येत्या २६ फेब्रुवारीला चिंचवड आणि कसबा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यावेळी इतक्या जोरात ईव्हीएमचे बटण दाबा की, ४४० व्होल्टचा करंट अजित पवार यांना लागला पाहिजे, असो टोला बावनकुळे यांनी लगावला आहे. आणि पुन्हा अजित पवारांनी चिंचवडचे नाव घेतले नाही पाहीजे, याची काळजी तुम्ही घ्या, असे आवाहन बावनकुळे यांनी मतदारांना केले आहे. यावर आता अजित पवार कसे प्रतिउत्तर देतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिवसभर दौरा केला. सकाळपासून सुरु झालेले बैठकांचे सत्र रात्री उशीरापर्यंत सुरु होते. यावेळी रात्री उशीरा झालेल्या एका बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. प्रचाराचा शेवटचा आठवडा असल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे सुरु झाले आहे.

२६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही मतदारसंघात मतदान होणार आहे. मतदान किती टक्के होते यावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. मात्र आता शेवटच्या दिवसात एकमेकांची उणीधुणी काढणे सुरु आहे. याचा मतदारांवर किती परिणाम होतो. हे मतदानाच्या दिवशी आणि मतदान झाल्यानंतर लक्षात येईल. तसेच कोणता उमेदवार विजयी होतो यावर सुद्धा अवलंबून आहे. 

Tags:    

Similar News