एकनाथ शिंदे यांना भाजपने मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले, अशा भावना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. यानंतर सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावर सारवासारव करावी लागली. मुख्यमंत्री हाच नेता असतो आणि आपले नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत, असे स्पष्ट केले.