भाजप- मनसेत युती होणार?

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात भाष्य केलं आहे.;

Update: 2021-08-02 13:58 GMT

पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप एकत्र येणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भाजप-मनसे युतीला हिरवा कंदिल दिला आहे . मात्र, त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं म्हटलं आहे. ते पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.

मनसेचा परप्रांतीयांना असणारा विरोध ही युतीमधील मोठी अडचण आहे. पण ही अडचण दूर झाली तर युती होऊ शकते , असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान ही युती फक्त महापालिका निवडणुकांसाठी न राहाता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील राहणार असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरे हे माझे आवडतं व्यक्तिमत्त्व आहेत. मनसे बरोबर युती होऊ शकते पण मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. त्यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे. याबाबत मी राज ठाकरेंना लवकरच भेटणार आहे असं पाटील म्हणाले.

दरम्यान, पाटील यांनी बोलताना, राज ठाकरेंनी मला क्लिप पाठवली असून ती मी ऐकली असल्याचं सांगितलं. या क्लिपमध्ये नेमकं काय आहे हे मात्र समजू शकलेले नाही, मात्र राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना कोणतीही क्लिप पाठवलेली नाही हे आधीच स्पष्ट केलं आहे.त्यामुळे मनसे आणि भाजप यांच्यात युती होणार का हे पाहणं येत्या काळात महत्वाचे ठरणार आहे.

Tags:    

Similar News