धक्कादायक...!! शिवसेना अडकणार का कोंडीत, संकटावर संकट येऊन ठेपतायत

एकीकडे प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी महाविकास आघाडीची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाच शिवसेनेला काँग्रेसने धक्का दिला आहे. शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसेच माजी राज्यमंत्री अशोक शिंदे काँग्रेसच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हे आता काँग्रेसचा गाडा पुढे नेणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत अशोक शिंदे काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे अशी माहिती पुढे येत आहे, प्रणय ढोले यांचा रिपोर्ट

Update: 2021-07-13 05:26 GMT

अशोक शिंदे हिंगणघाट मतदारसंघातून आता पर्यंत तीन वेळा सलग आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. अगोदर, १९९५ मध्ये शिंदे शिवसेनेचा एबी फॉर्म भरून पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा त्यांच्या मतदार संघाचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात सुरु होती.

शिवसेनेच्या माजी खासदारासोबत तीव्र मतभेद

शिवसेनेचे वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख आणि माजी खासदार अनंत गुढे आणि अशोक शिंदे यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत. अशोक शिंदे यांनी मुंबईला जाऊन शिवसेना पक्षनेतृत्वाकडेही गुढे प्रकरणात न्याय मागितला होता, परंतु सेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नसल्याचं बोललं जातं. त्यानंत अशोक शिंदेंनी शिवबंधन सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला आहे.

आता मुळात प्रश्न येतोच कि नेमके कोण आहेत हे अशोक शिंदे?

▪️अशोक शिंदे हे वर्ध्यातील हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत

▪️१९९५,१९९९ आणि २००९ असे तीन वेळा शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत

▪️२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव झाला

▪️अशोक शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद

मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिंदेंकडे राज्यमंत्रिपद

काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या उपस्थितीत शिंदे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

मुंबईत आज १३ जुलै रोजी दुपारी दोन वाजता अशोक शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यापासून नाना पटोले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा एल्गार केल्यापासूनच पटोलेंच्या नेतृत्वात अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश होऊ लागले आहेत. अशोक शिंदेही नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील.

Tags:    

Similar News