उद्धव ठाकरे यांना धक्का, धनुष्यबाण शिंदे यांच्या हाती

गेल्या सात महिन्यांपासून राज्यातील सत्तासंघर्ष सुरु आहे. या सत्तासंघर्षमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये पक्षाचे चिन्ह आणि नावावरुन वाद सुरु होता. हा वाद निवडणुक आयोगासमोर गेला होता. त्यावर आज निकाल देताना निवडणुक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना हे नाव चिन्ह बहाल करण्यात आले आहेत.

Update: 2023-02-17 14:00 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले आहे. केंद्रीय निवडणुक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका मानला जातोय. केंद्रीय निवडूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला आहे. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असे स्पष्टपणे लिहिले आहे.


Full View

महाराष्ट्राच्या राजकारणात आठ महिन्यापूर्वी सर्वात मोठा भूकंप होणारी घटना घडली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात ४० आमदारांच्यासोबत बंडखोरी केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सूरत, त्यानंतर गुवाहाटाली गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. एकनाथ शिंगे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणले होते.

या घडामोडीनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या आठ महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरु होती. निवडणुक आयोगात याबाबतचा युक्तीवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणे अपेक्षित होते. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने जवळपास ७१ पानांचा अहवाल दिला आहे. मात्र कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडे आहे तेच चिन्ह राहणार असल्याचे सुद्धा निवडणुक आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

Tags:    

Similar News