वैद्यकीय कारणास्तवर जामीनावर असलेल्या भीमा कोरेगाव - एल्गार परीषद आरोपी वरावरा राव यांच्या जामीन मुदतवाढ याचिकेवर कोर्टानं १५ सप्टेंबरपर्यंत शरण येण्याची गरज नाही असे सांगत पुढील २४ सप्टेंबरच्या सुनावणीत निर्णय घेऊ असे सांगितले आहे.
मुंबई हायकोर्टानं वरवरा राव यांना 6 महिन्यासाठी जामीन मंजूर केला आहे. राव यांनी इतर आरोपींच्या संपर्कात राहू नये, साक्षीदारांवर दबाव आणू नये, अशा सूचना न्यायालयानं दिल्या होत्या. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये आणि 6 महिन्यानंतर त्यांनी सरेंडर व्हावं किंवा जामिनासाठी पुन्हा अर्ज करावा, असे आदेश आहेत.
त्यानुसार वैद्यकीय कारण देत वरावरा राव यांनी अर्ज केला होता. त्यावर कोर्टानं १५ सप्टेंबर पर्यंत शरण येण्याची गरज नाही असं स्पष्ट केलं. पुढील सुनावणी २४ सप्टेंबर रोजी होणार असून आता जामीनाला २५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
वैद्यकीय कारणास्तव आणखी सहा महीने जामीन मिळावा अशी वरावरा राव यांची मागणी आहे. मुंबईपेक्षा हैदराबादमधे चांगले उपचार आणि कुटुंबियाचे सहकार मिळेल अशी मागणी त्यांनी कोर्टाकडे केली आहे.
वरवरा राव हे प्रसिद्ध तेलुगू कवी आहेत. त्यांचा जन्म वारांगाळ जिल्ह्यात झाला आहे. वयाच्या 17 व्या वर्षापासून त्यांनी कवितांचे लेखन करत असून हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून त्यांनी तेलुगू साहित्यातमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. राव यांच्यावर मार्क्सवादी तत्वज्ञानाचा प्रभाव राहिला असून त्यांनी प्राध्यापक म्हणून देखील काम केले आहे. राव यांनी 15 कवितासंग्रहांचं लेखन केले आहे. आंध्रप्रदेशातील विविध सामाजिक आंदोलंनामध्ये त्यांचा सहभाग राहिला असून विविध प्रकरणांमध्ये आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना यापूर्वी देखील अटक केली होती.