शिवसेना कुणाच्या बापाची नाही, भावना गवळी यांनी उध्दव ठाकरे यांना डिवचले

शिंदे गटाच्या आमदार आणि खासदारांना गद्दार म्हटले जाते. त्यावरून खासदार भावना गवळी यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.;

Update: 2022-08-23 15:28 GMT

आम्हाला गद्दार म्हटलं जातं. मात्र आम्ही गद्दार नाही. मात्र आम्ही शिवसेना सोडलेली नाही. शिवसेना कुणाच्या बापाची नाही. शिवसेना आमच्या बापाने उभी केली आहे, असं म्हणत खासदार भावना गवळी यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला आहे. त्या वाशिम येथील सभेला संबोधित करत होत्या.

यावेळी बोलताना भावना गवळी यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. यामध्ये म्हटले की, आम्हाला गद्दार म्हटले जाते. मात्र शिवसेना ही कुणाच्या बापाची नाही. ती आमच्या बापाने वाढवली. मात्र एकाच वेळी 40 आमदार आणि 12 खासदार का सोडून जातात यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असं म्हणत भावना गवळी यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

वाशिम मतदारसंघात भगवा फडकवणारच असा विश्वास भावना गवळी यांनी व्यक्त केला. तसेच एकनाथ शिंदे यांनी आम्हाला साथ दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हेसुध्दा त्यांच्या सोबत होते. मात्र अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली नाही. त्यांना आठवू इच्छित नाही, असं म्हणत उध्दव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला.

ज्यांनी साथ दिली. त्यांची साथ कधीच सोडणार नाही, असंही भावना गवळी म्हणाल्या.

Tags:    

Similar News