ज्येष्ठ असूनही ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही, भास्कर जाधवांची खदखद...
२०१९ साली सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने मी ज्येष्ठ असूनही उद्धव ठाकरेंनी मंत्रिमंडळात घेतलं नाही, अशी खदखद ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. मात्र सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आहे, असंही जाधव यांनी सांगितले.
आगामी विधानसभा निवडणुकीत नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांची मुलं, उदय सामंत (Uday Samantha) आणि रामदास कदम (Ramdas Kadam) हे सर्वजण माझ्याविरोधात विधानसभा निवडणूकीला तुटून पडणार असल्याचे ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी सांगितले. कारण या सर्वांना अंगावर घेतले असल्याचे जाधव यावेळी म्हणाले. भाजपा (bjp) आणि शिंदे गटाच्या रोषालाही सामोरं जावं लागणार असल्याचं पूर्ण भान असल्याचे सुद्धा जाधव यावेळी म्हणाले. पण एक तत्व आणि सिद्धांतासाठी आपण उभे असल्याचे जाधव यांनी सांगितले. उद्धव ठाकरे एकाकी लढत असून, त्यांची साथ सोडायची नाही, या ध्येयानं उभा आहे. असे मत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी व्यक्त केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जाधव बोलत होते.
२०१९ साली विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सभासद असूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्याला मंत्रिमंडळात घेतले नाही, अशी खदखद आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. परंतु, आज डोक्यात स्वार्थ आणि व्यवहार नाही आहे. जे घडलं आहे ते चुकीचं आणि वाईट घडलं आहे. २०१९ साली भाजपाने शिवसेनेच्या (Shiv Sena) ७० जागा पाडल्या. माझ्या मतदारसंघात भाजपाची लोकं राष्ट्रवादीच्या बुथवर बॅनर लावून बसले होते. कमळ समजून घडाळ्याचं बटण दाबा, असं सांगत होतं. हे निष्ठेच्या गोष्टी कोणाला सांगत आहेत. हे लोकं विश्वासघातकी आहेत, अशी टिका भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजपावर यावेळी केली. आगामी निवडणुकीत सर्वांच्या विरोधात लढण्याचा मी निश्चय केला असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. फायदा किंवा नुकसानीचा विचार केला नाही, सर्व परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) पाठीशी उभं राहायचं मी ठरवलं असल्याचं जाधव यावेळी म्हणाले. आणि त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली, तरी मी कोणाला दोष देणार नाही, असेही भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी यावेळी सांगितले.