भास्कर जाधव यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य
भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांच्या दिसण्यावर वादग्रस्त भाष्य केले आहे.;
भास्कर जाधव यांच्याकडून उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात येते. त्याचा समाचार घेताना भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते ठाण्यात ठाकरे गटाच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करतात. ते माझे चांगले मित्र आहेत. परवा मी नागपूरला असताना ते मला भेटले होते. त्यावेळी मी त्यांच्याकडे पाहिलं तर मी अचानक म्हणालो. बावनकुळे साहेब तुम्ही. कारण चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्रातील आहेत. पण ते वेस्ट इंडिजच्या (West indis) खेळाडूसारखे दिसतात, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले. त्यावर उत्तर देतांना बावनकुळे म्हणाले, व्यक्तीगत टीकेने आनंद होत असेल तर आनंद घ्यावा. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाला असतानाच चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र गांधीगिरी मार्गाने उत्तर दिले आहे.