वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना जोडण्याचे काम भारत जोडो यात्रेने केलंय – काँग्रेस नेते सचिन पायलट असे का म्हणतात.

Update: 2022-12-19 14:39 GMT

"भारत जोडो यात्रेमुळे अनेक नागरिकांचे लक्ष केंद्रीत करण्यात आले असून ज्या मुद्यांवर यात्रा काढण्यात आली ते मुद्दे खुपच महत्त्वाचे आहेत." असे काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. त्याच बरोबर सचिन पायलट यांनी आपल्या भाषेणातून यात्रेबद्दल अनुभवही सांगितले "चार डिंसेबर रोजी यात्रा राजस्थान येथे पोहचल्यानंतर प्रत्येकजण यात्रेपेक्षा भारत जोडो संदेशाशी जोडला गेला आहे. सरकाराने निवडणुकपूर्वी जे काही आश्वासने दिली होती त्याची उत्तरे मागण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे.

भारत जोडो यात्रेने लोकांना जोडण्याचे काम केले आहे, आता पर्यंत यात्रेने ३००० हजार किलोमीटर प्रवास केला आहे. या यात्रेत मी पाहत आलोय यात्रेत समावेश झालेल्या लोकांनी कधीच यात्रेबद्दल नकारात्मक बोलले नाहीत. यात्रेत प्रेम, एकता, आपुलकी, याचा संवाद फक्त होतोय." असे पायलट म्हणाले.

तसेच सचिन पायलट पुढे म्हणाले. "वेगवेगळ्या जातीला, धर्माला, जोडण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. ज्या ज्या राज्यात यात्रा पोहचली त्या त्या राज्यात यात्रेचे मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले, पण सर्व राज्याचे रेकाँर्ड ब्रेक राजस्थानने केले आहेत." असे सचिन पायलट म्हणाले राज्यात तरुणांचा बेरोजगारांचा प्रश्न आहे, महागाईवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. येणारे निवडणूकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर सर्वच प्रश्न सोडवले जातील असा विश्वासही पायलट यांनी व्यक्त केलाय. तसेच आम्ही काँग्रेस नेते सामान्य लोकांसोबत आहोत. असे ही सचिन पायलट भाषणाच्या शेवटी म्हणाले.


Full View



Tags:    

Similar News