बेटी बचाओ...पण कुणापासून? काँग्रेसचा पंतप्रधान मोदी यांना सवाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2015 रोजी बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा हरियाणातील पानिपत येथून दिला होता. मात्र बेटी बचाओ...पण कुणापासून? असा सवाल काँग्रेसने या योजनेचा 8 वर्षपुर्तीनिमीत्त उपस्थित केला आहे.;
हरियाणातील पानिपतमध्ये बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी केली होती. त्यानुसार देशात एक उत्साही वातावरण तयार झालं होतं. त्यानंतर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना महिलांवर अत्याचार करणारी एक विकृती असल्याचं म्हटलं होतं. पण आता पंतप्रधान मोदी यांच्या पक्षातीलच खासदार असलेल्या ब्रिजभुषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटू विनिशा फोगाट यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
ज्या पंतप्रधान मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ चा नारा दिला होता. त्यांच्याच पक्षाच्या खासदारावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनाते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओचा नारा दिला होता. मात्र तो नारा भाजपच्याच नेत्यांपासून मुलींना वाचवण्यासाठी होता का? असा सवाल काँग्रेसच्या सुप्रिया श्रिनाते यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे देशातील मुली आणि महिलांना सन्मान आणि सुरक्षा दिली तरच बेटी बचाओ, बेटी पढाओ योजना यशस्वी होऊ शकते, असंही त्या म्हणाल्या.