बसवराज बोम्मई होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, कोण आहेत बसवराज बोम्मई?
Basavaraj Bommai is Karnataka next Chief Minister; Swearing Tomorrow, Who is Basavaraj Bommai
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी. किशन रेड्डी हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. तसंच भाजपचे कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंह सुद्धा या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, हा निर्णय भाजप हाय कमांड घेतला असल्याचं समजतंय.
कोण आहेत बसवराज बोम्मई? Who is Basavaraj Bommai
नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे बीएस येदियुरप्पा यांच्या जवळचे मानले जातात.
येदियुरप्पा यांच्या नंतर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे लिंगायत समुदायातील मोठे नेते मानले जातात. त्यांच्या निवडीनंतर लिंगायत समुदायाचा असंतोष कमी होईल..
दुसरी बाब म्हणजे ते संघ परिवाराशी संबंधी आहे.