बसवराज बोम्मई यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, कोण आहेत बसवराज बोम्मई?
आज कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई यांना राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. बी. एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपालांनी फक्त बसवराज बोम्मई यांनाच मंत्रीपदाची शपथ दिल्यानं मंत्रीमंडळ विस्तार नंतर केला जाण्याची शक्यता आहे.
कोण आहेत बसवराज बोम्मई? Who is Basavaraj Bommai
नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे बीएस येदियुरप्पा यांच्या जवळचे मानले जातात. येदियुरप्पा यांच्या नंतर बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) हे लिंगायत समुदायातील मोठे नेते मानले जातात. त्यांच्या निवडीनंतर लिंगायत समुदायाचा असंतोष कमी होईल.. दुसरी बाब म्हणजे ते संघ परिवाराशी संबंधी आहे.