राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारात अपक्षांची वर्णी लागली नाही. त्यामुळे अपक्ष नाराज असल्याची चर्चा आहे. त्यापार्श्वभुमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी अपक्षांच्या मंत्रीमंडळातील समावेशाबाबत वक्तव्य केलं आहे.
राज्य मंत्रीमंडळ विस्तारात अपक्षांचा समावेश करण्यात आला नाही. त्यानंतर बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच उस्मानाबाद येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका प्रहार हा पक्ष एकटा लढणार आहे. त्याबरोबरच भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची इच्छा असेल तर ते सोबत घेतील, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यापार्श्वभुमीवर बच्चू कडू यांच्या मंत्रीपदाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भूमिका मांडली आहे.
मंत्री केसरकर म्हणाले की, बच्चू कडू यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यामुळे आगामी मंत्रीमंडळ विस्तारामध्ये बच्चू कडू यांचा समावेश होणार आहे. त्यामुळे बच्चू कडू यांनी संयम बाळगायला हवा, असं मत व्यक्त केले.
बच्चू कडू यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केल्यानंतर दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बच्चू कडू आगामी काळात मंत्रीमंडळात दिसण्याची आशा पल्लवित झाली आहे.