देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. त्यातच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक असतानाच राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील तरूण दाखल झाला आहे.
देशाचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यापुर्वी देशात नव्या राष्ट्रपतीची निवड करणे आवश्यक असते. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार 29 जुन ही राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे अंतिम मुदतीला अवघे चार दिवस बाकी असताना औरंगाबाद येथील तरुणाने राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी नामनिर्देशनपत्र भरले आहे.
शहरातील समाज सेवक विशाल उद्धव नांदरकर या तरुणाने चक्क दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरले आहे, म्हणजेच सदरील तरुण हा राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची त्याची इच्छा असून संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आपण फॉर्म भरल्याची माहिती त्यांने दिली आहे. सध्या त्याने राष्ट्पती पदाच्या निवडणुकीसाठी भरलेला फॉर्मची पावती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.
विशाल नांदरकर हा औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात राहणारा तरुण असून नेहमीच सामाजिक कामासाठी तो पुढे असतो. मात्र आज त्याने चक्क दिल्लीत जाऊन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा मनात ठेवून चक्क नामनिर्देशन फॉर्म भरले आहे. त्याने भरलेल्या फॉर्मची आज समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.
आता राज्यात चालु असलेल्या राजकीय घटनांची चर्चा असताना या औरंगाबादच्या तरुणाने संपूर्ण समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातला आहे.