22 हजार कोटीचा डांबर कुणी खाल्ला?

Update: 2022-12-20 09:53 GMT

आमदारांच्या विकास निधीवरून( mla fund) सुरू झालेल्या गदारोळाने कामकाजाची सुरुवात झाली खरीच परंतु रस्ते सुरक्षा आणि मुंबईतील फुलांच्या लक्षवेधी सूचनेदरम्यान आमदार आदित्य ठाकरे ( Aditya thakare) आणि शिंदे गटांच्या आमदारांमध्ये जोरदार संघर्ष झाला..

उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;( devendra fadnavis) यांनी डांबर घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली जाईल असे सांगितले. आपल्याला कुणालाही टार्गेट करायचं नाहीये. पण यासंदर्भात जी काही चौकशी आवश्यक असेल, ती केली जाईल असेही देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. तत्पूर्वी रस्त्या सुरक्षा वरून सुरू असलेल्या लक्षवेधीच्या चर्चेत सहभागी होताना आदित्य ठाकरे यांनी रात्री आमदार पळून जाणारे मुंबई ते सुरत रस्त्यांची गुणवत्ता तपासा.. असा टोला लगावला.

सुरतच्या रस्त्याची खूपच धास्ती आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. जे काही थोडे शिल्लक सेनेमध्ये आहेत. त्यांना त्या रस्त्याचा वापर करावा लागू नये, एवढी तरी काळजी त्यांनी आता घेतली पाहिजे असा मंत्री शंभूराज देसाई यांचा प्रति टोला लगावला.

सभागृहातलं वातावरण व्यवस्थित राहण्यासाठी आदित्य ठाकरेंनी मुद्दा उपस्थित केला. पण त्यावर उत्तर देण्याऐवजी अजून काहीतरी मुद्दे उपस्थित केले गेले. शंभूराज देसाई, आपण ज्येष्ठ आहात. काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. सभागृह चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे आहे असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.

मातोश्री चे रस्ते कसे होते ते सांगू का? गुलाबराव पाटील यांचे प्रत्युत्तर आले. सुरत गुवाहाटीमुळे तुमचा (ठाकरे गटा)चा विषय आता संपला आहे असेही गुलाबराव पाटील यांना सांगितले. समृद्धी महामार्गाच्या सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून ताशी १५० किलोमीटर इतकी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली होती पण आता तिथे १२० किमी वेगमर्यादा आपण घालून दिली आहे. यावर वेग जाऊ नये, यासाठी स्पीडगनची व्यवस्था करण्यात आली आहे. जेव्हा असा वेग वाढेल, तेव्हा पुढच्या टोलनाक्याला त्या वाहनाला थांबवलं जाईल. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर यासंदर्भात प्रयोग करण्यात आला आहे असे एका उत्तरात मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील पुलांच्या दुरुस्तीबाबत झालेल्या लक्षवेधी सूचनाच्या चर्चेत आमदार आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

२२ हजार कोटींचं डांबर कुणी खाल्लं, याची माहिती आहे. त्याची चौकशी करायची असेल, तर ती व्हायला हवी. गेल्या २५ वर्षांत डांबराचे जेवढे रस्ते झाले, त्यात किती पैसे खाल्ले, त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी शेलार यांनी केली.उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डांबर घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली जाईल असे सांगितले.

Tags:    

Similar News