BCCI च्या खजिन्याच्या चाव्या आशिष शेलार यांच्या हाती

Update: 2022-10-18 10:12 GMT

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(BCCi) नियुक्त्या नुकत्याच पार पडल्या. यामध्ये मुंबई भाजप नेते आशिष शेलार यांच्या हाती BCCI च्या खजिन्याच्या चाव्या आल्या आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नियुक्त्या नुकत्याच झाल्या. यामध्ये रॉजर बिन्नी (Roger binny) यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी (President of BCCI) नियुक्ती करण्यात आली आहे. जय शहा (Jay Shah) बीसीसीआयच्या सचिवपदी कायम आहेत. मात्र दुसरीकडे मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांना BCCI च्या खजिनदार (Treasurer) पदी नियुक्ती देण्यात आली आहे.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी, उपाध्यक्षपदी राजीव शुक्ला(Rajiv Shukla), सचिवपदी जय शहा, सहसचिव पदी दैवाजित साकिया (Daivajit sakiya) तर खजिनदारपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मंगळवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यामध्ये अध्यक्षपदासाठी रॉजर बिनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे रॉजर बिनी हे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगूली यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील.

सौरव गांगूली हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक होते. मात्र इच्छा असतानाही त्यांना अध्यक्षपद सोडावे लागल्याची चर्चा आहे.

ICC च्या अध्यक्षपदासाठी BCCI चे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन आणि केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) इच्छूक होते. मात्र अनुराग ठाकुर हिमाचल प्रदेशातील निवडणूकांमध्ये व्यस्त राहण्याची शक्यता असल्याने आणि श्रीनिवासन यांना वयोमानानुसार पाठींबा मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांना संधी मिळाली नाही.

अरुण धुमाळ यांच्याकडून BCCI च्या चाव्या आशिष शेलार यांच्याकडे सुपुर्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून आशिष शेलार यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे म्हटले जात होते. त्याची स्पष्टता आशिष शेलार यांची नियुक्ती बीसीसीआयच्या खजिनदारपदी नियुक्ती मिळाल्याने झाली आहे.

Tags:    

Similar News